Ad will apear here
Next
अंजनीच्या सुता, तुला रामाचं वरदान...
कोल्हापूर जिल्ह्यातील मनपाडळे येथील समर्थस्थापित मारुतीसज्जनगडावरील धाब्याचा मारुती

‘अंजनीच्या सुता, तुला रामाचं वरदान’ हे दादा कोंडके यांनी लिहिलेले आणि महेंद्र कपूर यांनी गायलेले गीत आशय, संगीत, सादरीकरण अशा सगळ्याच बाबतीमध्ये अत्यंत सुंदर आहे आणि त्यामुळेच त्याची लोकप्रियता कायम आहे. या गाण्याच्या संगीत दिग्दर्शकांचे नाव राम-लक्ष्मण, हा एक अनोखा योगायोगच. आज हनुमान जयंतीनिमित्त ते गीत येथे देत आहोत. गीताचा व्हिडिओ शेवटी दिला आहे.
...........
हे.. अंजनीच्या सुता, तुला रामाचं वरदान
अन् एकमुखानं बोला बोला जय जय हनुमान
एकमुखानं बोला. बोला जय जय हनुमान
अंजनीच्या सुता, तुला रामाचं वरदान
अंजनीच्या सुता, तुला रामाचं वरदान
एकमुखानं बोला. बोला जय जय हनुमान
एकमुखानं बोला, बोला जय जय हनुमान

हे.. दिव्य तुझी रामभक्ती भव्य तुझी काया
बालपणी गेलासी तू सूर्याला धराया
बालपणी गेलासी तू सूर्याला धराया
अरे... हादरली ही धरणी, थरथरले आसमान
एकमुखानं बोला, बोला जय जय हनुमान
अंजनीच्या सुता, तुला रामाचं वरदान
एकमुखानं बोला, बोला जय जय हनुमान
लक्ष्मणा आली मूर्च्छा लागुनिया बाण
हे द्रोणागिरीसाठी राया केले तू उड्डाण
द्रोणागिरीसाठी राया केले तू उड्डाण
हे तळहातावर आला घेऊनी पंचप्राण
एकमुखानं बोला, बोला जय जय हनुमान
अंजनीच्या सुता, तुला रामाचं वरदान
एकमुखानं बोला, बोला जय जय हनुमान

हे... सीतामाई शोधासाठी गाठलीस लंका
तिथं रामनामाचा तू वाजविला डंका रे डंका
तिथं रामनामाचा तू वाजविला डंका
दैत्य खवळले सारे परि हसले बिभीषण
एकमुखानं बोला, बोला जय जय हनुमान
अंजनीच्या सुता, तुला रामाचं वरदान
एकमुखानं बोला, बोला जय जय हनुमान
हार तुला नवरत्नांचा जानकीने घातला
पाहिलेस फोडुन मोती राम कुठे आतला
पाहिलेस फोडुन मोती राम कुठे आतला
उघडुनि आपली छाती दाविले प्रभू भगवान
एकमुखानं बोला, बोला जय जय हनुमान
अंजनीच्या सुता, तुला रामाचं वरदान
एकमुखानं बोला, बोला जय जय हनुमान

आले किती गेले किती संपले भरारा
तुझ्या परी नावाचा रे अजुनी दरारा
तुझ्या परि नावाचा रे अजुनी दरारा
धावत ये लवकरी आम्ही झालो रे हैराण
एकमुखानं बोला, बोला जय जय हनुमान
अंजनीच्या सुता, तुला रामाचं वरदान
एकमुखानं बोला, बोला जय जय हनुमान
धन्य तुझे रामराज्य धन्य तुझी सेवा
तुझे भक्त आम्ही सारे उपाशी का देवा
तुझे भक्त आम्ही सारे उपाशी का देवा
घे बोलावुनि आता कंठाशी आले प्राण
एकमुखानं बोला, बोला जय जय हनुमान
अंजनीच्या सुता, तुला रामाचं वरदान
अंजनीच्या सुता, तुला रामाचं वरदान
एकमुखानं बोला, बोला जय जय हनुमान
एकमुखानं बोला, बोला जय जय हनुमान

राम लक्ष्मण जानकी, जय बोला हनुमान की
राम लक्ष्मण जानकी, जय बोला हनुमान की
राम लक्ष्मण जानकी, जय बोला हनुमान की
राम लक्ष्मण जानकी, जय बोला हनुमान की
हे राम हे राम हे राम
बोला रामभक्त हनुमान की जय!

(समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या ११ मारुतींपैकी सातारा जिल्ह्यातील मारुतींविषयी वाचण्यासाठी येथे क्लिक करा. कोल्हापूर जिल्ह्यातील मारुतींविषयी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

(दादा कोंडके यांच्याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा. महेंद्र कपूर यांच्याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)







 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZWICL
Similar Posts
अशीच एक संजीवनी घेऊन तू आजही येशील... कृतेतु मारुताख्यश्च, त्रेतायां पवनात्मज । द्वापारे भीमसंज्ञश्च, रामदास: कलौ युगे । कृतयुगातला मारुती, त्रेतायुगातला पवनात्मज, द्वापारातला भीम आणि कलियुगात रामदास या नावाने हनुमंत जन्म घेईल असं सांगणारा भविष्योत्तर पुराणातील हा श्लोक! प्रत्येक युगातल्या या मारुती अवताराचं व्यवच्छेदक लक्षण काय असावं
प्रवास कार्यसाधक होण्यासाठी... प्रवासातील बाधा, विघ्न दूर होऊन प्रवास कार्यसाधक होण्यासाठी उपासना..

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language